Breaking News

पालकमंत्र्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप


कर्जत/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या आदर्श आचारसंहितेची कर्जत तालुक्यात ऐसी तैसी परिस्थिती असल्याचे दिसते. सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांकडूनच आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचा प्रकार कर्जतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे यांनी आरोप केला आहे.

सध्या आचारसंहिता सुरू असल्याने केलेल्या विकास कामांचे फलक, राजकीय पक्षांचे फलक, जाहिरातबाजी, निवडणुकीची चिन्हे आदी प्रदर्शित करणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही फलक, पोस्टर बंदिस्त करून ठेवणे गरजेचे आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांचे पोस्टर आचारसंहिता लागू असतानाही प्रदर्शित केलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे या प्रकारातून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या निधीतून एलईडी दिवे बसविण्याचे काम करण्यात आले. त्या खांबावरील पोस्टरवर पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचा फोटो, नाव, आदी मजकूर आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही जैसे थे स्थितीत आहे. प्रशासन सबंधितावर कारवाई करणार का? हा प्रश्‍न आहे. आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याने श्रीहर्ष शेवाळे यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.
चौकट