Breaking News

निवृत्त प्राध्यापकांनी नाकारला सेवानिवृत्तीचा लाभ


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांनी संस्थेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हक्काच्या अर्जित रजेचा लाभ नाकारत याची मिळणारी रक्कम न घेत संस्थेस आधार दिला आहे. यातून एक आदर्श निर्माण केला आहे. यासर्व निवृत्त प्राध्यापकांचा सत्कार  महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहातआयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

अनुदानित प्राध्यापकांच्या पगारापोटी शासन महाविद्यालयांना अनुदान देते. परंतु पुणे विद्यापीठाच्या जून्या नियमानुसार प्राध्यापकांना 180 दिवसांच्याअर्जित रजांचे रोखीकरण करुन द्यावे याचा आधार घेऊन काही प्राध्यापक न्यायालयात गेले होते. शासनाने हा नियम चुकीचा ठरवून सदर लाभाची रक्कमअनुदान म्हणून न देण्याची भुमिका घेतली. सर्वोच्च न्यायालयाने सदर रक्कम संस्थांनी प्राध्यापकांना द्यावी असा आदेश केल्याने संस्थेवर मोठे आर्थिक संकटआले होते.

या पार्श्‍वभूमीवर शिक्षण प्रसारक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सर्व निवृत्त प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन केले होते. 34 पैकी 28 प्राध्यापकांनी सहकार्याचीभुमिका घेतल्याने संस्था कर्जबाजारी होण्यापासून वाचली. या प्राध्यापकांचा सन्मान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते व आमदार बाळासाहेब थोरात, आमदारडॉ.सुधिर तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्ताने यासर्व प्राध्यापकांना ‘दधिची’ ही उपाधी देऊन त्यांच्यावर डॉ.संजय मालपाणी यांनी लिहीलेल्या ‘मी पाहीला दधिची’ या पुस्तकाचे प्रकाशन केलेजाणार आहे. संस्था आवारातील कौंडिण्य संशोधन भवनाच्या इमारतीत एका भिंतीला ‘दधिची वॉल’ बनवून त्यावर यासर्व ऋषीतुल्य प्राध्यापकांची तैलचित्रेलावली जाणार आहेत.