Breaking News

मोदींकडून श्रीमंत लोकांची चौकीदारी : राहुल गांधीचंद्रपूर : ‘मला पंतप्रधान नका बनवू मला चौकीदार बनवा असे मोदी म्हणतात. या चौकीदारने भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांची चौकीदारी केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अच्छे दिन आल्याची आधी घोषणा केली जायची आता चौकीदाराची घोषणा केली जाते. या चौकीदाराने करोडो रुपये अनिल अंबानी यांना दिले असल्याचा आरोप काँगे्रस अध्यक्ष राहुल यांनी केला. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आयोजित जाहीर सभेत गांधी बोलत होते.

सर्वांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये आले का असा सवाल करत राहुल गांधी यांनी सर्वांना प्रश्‍न उपस्थित केला. मोदी सरकारने फक्त आश्‍वासन दिले. मोदी चोरांना पैसे देत आहेत. नीरव मोदी, अनिल अंबानी, अदानी यांना मोदींनी पैसे दिले. मोदींनी 15 लोकांना करोडो रुपये दिले. 15 लाख रुपये तुमच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले जाऊ शकत नाही, कारण पंतप्रधान मोदी हे श्रीमंत लोकांची चौकीदारी करत असल्याचा आरोप राहुल गांधी केला. 2019 च्या निवडणुकीनंतर ज्याची महिन्याची कमाई 12 हजारापेक्षा कमी आहे त्याच्या बँक अकाऊंटमध्ये वर्षाला 72 हजार रुपये टाकले जाणार असल्याचे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. 25 कोटी कुटुंब 5 कोटी लोकांच्या बँक अकाऊंटमध्ये आम्ही पैसे यासाठी नाही टाकत की मोदी सरकारने तुम्हाला आश्‍वासन दिले. मोदी सरकारने 5 वर्षात लाखो लोकांना पैसा दिला आहे. विदर्भातली जनता कर्जमाफी मागते, आत्महत्या करतात. मात्र कर्जमाफीचे आश्‍वासन देऊन ही कर्जमाफी झाली नाही. निवडणुक जिंकल्यानंतर 10 दिवसाच्या आत काँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकर्‍यांचे कर्जमाफ केले. या देशात पैशाची काही कमी नाही मात्र तुमाला खोटे बोलले जाते. मजूर, शेतकरी पैसे मागत असेल तर त्यांच्यासाठी पैसे कमी मात्र अनिल अंबानी यांनी पैसे मागितले तर पैशांची काहीच कमी नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

‘तुम्हाला सांगितले जाते पैशांची कमी आहे. शेतकर्‍यांना पैसा दिला जाऊ शकत, तरुणांना कर्ज दिले जाऊ शकत नाही. मनरेगा योजनेला चालवायला 35 हजार कोटी रुपये खर्च होतो. या एका मनरेगाचा पैसा नीरव मोदी घेऊन फरार झाला. काँग्रेस पक्ष आल्यावर जो पैसा 15 जणांकडे जात आहे तो पैसा मी वर्षाच्या 72 हजार रुपये जनतेच्या अकाऊंटमध्ये टाकणार आहे. हे फक्त आश्‍वासन नाही तर हे मी करुन दाखवणार आहे. देशातल्या कंपन्या बंद पडल्या कारण देशात मोदीने नोटाबंदी केली.’ मोदींनी तुमच्या खिशातले पैसे काढले मात्र मी तुमच्या खिशात पैसे टाकणार आहे. मोदी जिकडे जातात तिकडे दुसर्‍यांवर टीका करतात. मोदींचे गुरु असलेल्या अडवाणींना त्यांनी स्टेजवरुन उचलून फेकून दिले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस जिकडे जाते तिकडे प्रेमाची भाषा करतात, न्यायाची भाषा करतात मात्र मोदी दुसर्‍यावर टीका करण्याचेच काम करतात. 2019 ला काँग्रेसचे सरकार येणार हे खरं आहे. सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे घेऊन जायचे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

‘मोदी दोन भारत बनवू पाहत आहेत’

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन भारत बनवू इच्छित आहेत. एक अनिल अंबानी, नीरव मोदी, अदानी यांचा भारत आणि दुसरा गरिब, मध्यमवर्गीय यांचा भारत मोदी बनवू इच्छित असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आज या सर्व भागातील उद्योगधंदे बंद झाले आहेत. काळ्यापैशांविरोधातील लढाई होती आपण सर्व बँकेबाहेर रांगेत उभे होते. या रांगेत अंबानी, नीरव मोदी, अदानी नव्हते. सगळ्या भ्रष्टाचारींनी काळापैसा पांढरा करून घेतल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. जीएसटीचा फायदा कोणला झाला. महागाई वाढत चालली आहे.