Breaking News

हार्दिक पटेलच्या श्रीमुखात लगावली

Image result for हार्दिक पटेल

अहमदाबाद : काँगे्रसचे नेते हार्दिक पटेल यांची शुक्रवारी गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील भागात प्रचार सभा सुरू असतांना, एका व्यक्तीने हार्दिकच्या श्रीमुखात लगावली. हार्दिक पटेल स्टेजवर भाषणासाठी उभे असताना अचानक स्टेजवर येऊन एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर सभेमध्ये गोंधळ झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला मारहाण केली.
हार्दिक पटेल यांच्या कानाखाली कोणी मारले हे अद्याप समोर आले नाही. गुजरातच्या सुरेंद्रनगरच्या बलदाना गावामध्ये हार्दिक पटेल यांची सभा सुरु होती. या सभेत भाषण सुरु असताना एक अज्ञात व्यक्ती स्टेजवर आली आणि त्याने हार्दिक पटेल यांच्या जोरात कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, हार्दिकच्या श्रीमुखात लगावणारा तरूण हा, गुजर समाजाचा असून, त्याला पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनावेळी मेडिकल सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. याकारणांमुळे त्याला त्याच्या पत्नीला गमवावे लागले होते. याचा राग मनात असल्यामुळे या व्यक्तीने हार्दिकच्या कानाखाली लगावली. तरुण गुजर हा महेसाणा जिल्ह्यातल्या कडी तालुक्यामध्ये जेसलपूर गावामध्ये राहणारा आहे. ज्यावेळी पाटीदार समाजाचे आंदोलन झाले होते. त्यावेळी गुजरात बंद होते. आंदोलनावेळी रास्तारोको करण्यात आला होता. त्यावेळी या आंदोलनचा फटका अनेकांना बसला. या आंदोलनात 14 तरुणांची हत्या झाली होती. या हत्येला हार्दिक पटलेचं जबाबदार असल्याचे तरुणने सांगितले आहे. दुसर्‍यांदा हार्दिक पटेल यांची अहमदाबादमध्ये मेळावा झाला. त्यावेळी माझा मुलगा आजारी होता. त्याला औषध आणण्यासाठी मी मेडिकलमध्ये गेलो होता. मात्र मेडिकल बंद होते. रस्ते बंद होते. हार्दिक पटेलला जेव्हा वाटते तेव्हा तो गुजरात बंदची हाक देतो. तो आहे तरी कोण गुजरातचा हिटलर आहे का? असा सवाल तरुण गुजरने विचारला आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेत ही घटना घडली आहे. हार्दिक पटेल स्टेजवर भाषणासाठी उभे असताना अचानक स्टेजवर येऊन तरुण गुजर या व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर सभेमध्ये गोंधळ झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरुण गुजरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या कारणामुळे लगावली श्रीमुखात

काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांची गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये प्रचारसभा झाली. या प्रचारसभे दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्या कानाखाली मारली. तरुण गुजर या तरुणाने हार्दिक पटेल यांच्या कानाखाली मारली. असे कृत्य करण्यामागचे कारण त्याने सांगितले आहे. ‘हार्दिक पटेल यांनी ज्यावेळी पाटीदार समाजाच्या आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी मला अनेक समस्यांना समोरे जावे लागले होते. त्याचवेळी मी ठरवले होते की, मी या माणसाला मारणार, या माणसाला मी धडा शिकवणार असल्याचे मी ठरवले’, असल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे.