Breaking News

शरद पवारांच्या घरातील एकही उमेदवार निवडूण येणार नाही – ना. चंद्रकांत पाटीलकोल्हापूर/प्रतिनिधी- राज्यात युतीला ४५ जागा मिळणार असून शरद पवारांच्या घरातील एकही उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत निवडूण येणार नसून साताऱ्यात उदयनराजे यांचा पराभव निश्चित होणार असल्याची प्रतिक्रीया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आपल्या कुटुंबासह मतदान केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

महसूल मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे, आपला हक्क बजावावा. तसेच राज्यात महायुती बळकट होणार असून आम्हांला ४५ जागा मिळतील. तर पश्चिम महाराष्ट्रात १० जागा या फिक्स येतील, यात शंका नाही. माढ्यातून शरद पवारांनी पराभवाच्या भीतीने माघार घेतली आहे. त्यांच्या कुटुंबाची घराणेशाहीला निवडणुकीत ऊत आला असून तो लोकांच्या डोळ्यावरही आला आहे. त्यामुळे पवार घरातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही.


कोल्हापूरात दोन्ही जागा एकतर्फी युतीलाच मिळणार असून साताऱ्यात लढत अटीतटीची होईल असे वाटत होते. मात्र समीकरण फिरले असून युतीचा विजय तर विद्यमाना खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव निश्चित होणार असल्याचे ना. चंद्रकांत पाटील म्हणाले.