Breaking News

पाणी फाउंडेशनच्या कामासाठी लागेल ती मदत करू : शेखरभाऊ गोरे


वडूज / प्रतिनिधी : दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करुन गाव पाणीदार करण्यासाठी वरुड गाव एक झालं आहे. पाणी फाउंडेशनसाठी आज श्रमदानाचा उचांक करत वॉटर कप जिंकायचाच या निर्धाराने ग्रामस्थ युवक आणि महिलांनी श्रमदान केले. या कामास लागेल ती मदत करणार असल्याचे शेखरभाऊ गोरे यांनी वरुडकरांना सांगितले.

आज शेखरभाऊ गोरे यांनी गावकरी श्रमदान करीत असलेल्या ठिकाणाला भेट देऊन पाणी फाउंडेशनच्या कामासाठी डिझेल खर्चासह 45 दिवस पोकलेन मशीन देण्याचे घोषित केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव, गणेश सत्रे, सचिन कदम, राहुल गोरे, अतुल पवार, दाऊदखान मुल्ला, वैभव मोरे, गणेश चव्हाण यांच्या सह वरुड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावर्षी 8 एप्रिल या दिवशी वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाली असून सलग 45 दिवस ही स्पर्धा चालणार आहे.आज सकाळपासून सगळा गाव जागा झालेला होता.प्रत्येकाची आपली काम उरकून सगळे जण वॉटर कपला जाण्यासाठी घाई करत होता.एक प्रार्थना करण्यात आली आणि सुरू झालं एक मिशन ट्रॅक्टर ट्रॉली, रिक्षा, दुचाकी या वाहनातून रॅली द्वारे सगळे कामाच्या ठिकाणी पोहचले.सगळा भुंडा असणारा माळ रंगीबेरंगी झाला.याठिकाणी सर्वांना एकत्र बसवून 45 दिवसांचे नियोजन कशा प्रकारे आहे, ते सांगण्यात आले.

सकाळी सकाळी माळरानावर खणखण असा आवाज येत काळ्या मातीची सेवा करण्याचं काम सुरू झाले. सगळे गावकरी महिला युवक युवती अगदी एकाद्या कुटुंबातील असल्या प्रमाणे काम करत होते त्याच बरोबर वयोवृध्द त्यांचे आत्मबल वाढवत होते अनेक महिला भगीणी लहान बाळांना घेऊन या श्रमदानात सहभागी झाल्या होत्या त्यांचा उत्साह खूप वाढला होता. श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासठी सर्वजन प्रयत्न करत होते. तर शेखर गोरे प्रतिष्टानच्या माध्यमातून आज ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले होते.