Breaking News

शनिशिंगणापूरमध्ये आजपासून पारायण सोहळासोनई/प्रतिनिधी
श्री. क्षेत्र शनिशिंगणापूर येथे सालाबादप्रमाणे महंत उदासी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज 7 एप्रिल ते 14 रोजी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रवचन हभप बाबसाहेब महाराज घायाळ, हभप महेश महाराज रेध्ये, अंकुश महाराज जगताप, मानजीमहाराज ढाले, बाबासाहेब महाराज वाळुंज, रघुनाथ महाराज गव्हाणे यांचे प्रवचन मार्गदर्शन होणार आहे. किर्तन मालिकेत बाळकृष्ण महाराज दळवी, वैष्णवी महाराज काळे, नारायण महाराज ससे, अंकुश महाराज कांदे, रामनाथ महाराज पवार, चंद्रभान महाराज म्हसलेकर, व हभप गणपत महाराज आहेर यांचा समावेश आहे. रविवार दि.14 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत हभप मच्छीन्द्र महाराज निकम, सलंबतपुर यांच्या कल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.