Breaking News

माहिजळगावात व्याख्यानाचे आयोजन


कर्जत/प्रतिनिधी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा 'नाचणारा नव्हे तर वाचणारा' युवक या विचारातून प्रेरित होऊन उत्सव समितीने डीजे मुक्त जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.

जयंतीनिमित्त नंदकुमार गाडे यांचे व्याख्यान झाले.युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांनी सांगितलेल्या विचारापैकी किमान एक विचार जरी आचरणात आणला तरी जयंती केल्याचे सार्थक होईल असे गाडे भाषणात म्हणाले. प्रास्ताविक जयराम साबळे यांनी केले. यावेळी सरपंच रावसाहेब शेटे, संतोष कुरूळे,शंकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य किशोर कोपनर, नवनाथ करूळे, दीपक जाधव,दिपक गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक गणेश शेटे,चेअरमन सचिन शेटे भाऱत घोडके,सावन शेटे, परसराम तोरडमल,उत्सव समितीचे अध्यक्ष सागर साबळे, गणेश जाधव, नाना तोरडमल केशव घोडके, भारत घोडके, विशाल जाधव,योगेश जाधव आदी उपस्थित होते.