Breaking News

श्रीगोंदा शहरात रामनवमीनिमित्त मिरवणूक


श्रीगोंदे/प्रतिनिधी : श्रीगोंदे शहरात बजरंग दलाच्यावतीने श्रीराम नवमीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेत ढोल तश्याच्या तालावर झेंडे उंचावत चांगलाच ताल धरला होता. श्रीगोंदे बस स्थानकापासून सायंकाळी या मिरवणुकीला सुरवात होऊन जय हनुमान जय श्रीराम या घोषणा देत तरुणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी श्रीगोंदे पोलिसांनी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.