Breaking News

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने


अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नतचेतनेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या उतरंडी नष्ट करुन केलेल्या सामाजिक क्रांतीचे कार्य प्रत्येकामध्ये जागृत करण्यासाठी त्यांचा जन्म दिवस जागतिक उन्नत चेतना दिवस म्हणून मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने साजरा करण्यात आला. तर हा दिवस जागतिक उन्नत चेतना दिवस म्हणून साजरा होण्याची विश्‍वयाचना करण्यात आली. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांचा समावेश असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आक्रोशनामा प्रसिध्द करण्यात आला.

प्रारंभी हुतात्मा स्मारकात डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, अंबिका नागुल, प्रकाश थोरात, आश्‍विन शेळके, किशोर मुळे, लतिका पाडळे, लिला रासने, नजमा शेख, फरिदा शेख, जयश्री भुजबळ, मनिषा नन्नवरे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संपुर्ण मानव जातीसमोर असलेले समस्या सोडविण्याची शक्ती उन्नत चेतनेमध्ये आहे. अनेक महापुरुषांनी उन्नतचेतनेच्या शक्तीवर समाजात परिवर्तन घडवले. मात्र सध्या उन्नतचेतनेचा अभाव असल्याने समाजात अनेक समस्या उभे राहत आहे. दारिद्रय, बेकारी, जातीय द्वेष, भ्रष्टाचार, स्त्री दास्य, अत्याचार सध्या फोफावत आहे. राज्यकर्ते व नोकरशाहीमध्ये उन्नतचेतना नसल्याने यांसारखे प्रश्‍न अधिक गंभीर बनत चालले आहे. देशात फक्त शिक्षणाचा प्रचार-प्रसार झाला. मात्र माणसे शहाणी व सुसंस्कृत करण्यासाठी उन्नतचेतनेचा शिक्षणाबरोबर विकास झाला नसल्याचे स्पष्ट करीत, शालेय शिक्षणाबरोबर उन्नतचेतनेचा विकास ही काळाची गरज असल्याची भावना अ‍ॅड.गवळी यांनी व्यक्त केली.

तसेच यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आक्रोशनामा प्रसिध्द करण्यात आला. या आक्रोशनाम्यात हायब्रीड लॅण्ड पुलिंगद्वारे घरकुल वंचितांना परवडेल अशी घरे मिळावीत, घरांचे स्वप्न साकार करण्यास तीन घरकुल कर्जदार, जामीनदार साखळी कर्ज योजना अमलात आनावी, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात यावा, शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाय योजना कराव्या, पडिक खडकाळ जमिनीवर लॅण्ड पुलिंगद्वारे औद्योगिक वसाहती उभारुन युवकांना रोजगार उपलब्ध करावा, लोकसंख्येचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग करुन जनजागृती करावी, नागरिकांमध्ये उन्नचेतना निर्माण करण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टीकोनाने देशाचा विकास साधण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये कॉन्टम फिजिक्स शिक्षणाचा समावेश करण्यासंदर्भातील मुद्दयांचा समावेश आहे. निवडून येणार्‍या सत्ताधार्‍यांना याचा स्विकार करण्याचा आग्रह धरण्यात आलेला आहे.