Breaking News

राजेंद्र खटावकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सपत्निक सत्कार


औंध / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील अंबवडे व शिरसवडी विकास सेवा सोसायटीचे सचिव राजेंद्र खटावकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल अंबवडे सोसायटीचे पदाधिकारी,ग्रामस्थ यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्या वतीने सहकार उत्कृष्टता व श्रेष्ठता पुरस्कार अंबवडे सोसायटीने पुणे विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला.सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते त्यांना सन्मानीतही करण्यात आले. 

या सर्व यशाच्या पाठीमागे अंबवडे विकास सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, विकास अधिकारी शांताराम पवार व विशेषतः सचिव राजेंद्र खटावकर यांच्या मेहनतीचे फळ असल्याने खटावकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

या सत्कार सोहळ्या प्रसंही चेअरमन अरुणा पवार, व्हाईस चेअरमन करिम आतार, सीमा पवार, सुखदेव पवार, भीमराव खिलारे, डॉ. सोपान पवार, दत्तात्रय पवार,अजित पवार,रवींद्र पवार आदी उपस्थित होते.