Breaking News

आकर्षक देखाव्यांव्दारे डॉ.आंबेडकरांच्या कार्याचा उलगडा


 कर्जत/प्रतिनिधी: कर्जत शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राशीन, मिरजगाव, कुळधरण, खेड, कोंभळी, माहीजळगाव, चापडगाव आदी भागात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आकर्षक देखावे, भव्य मिरवणूकी काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले.

सकाळी अकरा वाजता कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाआंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, अंबादास पिसाळ, नामदेव राऊत, प्रवीणत भास्कर भैलुमे मित्र मंडळाच्यावतीने जयंती कार्यक्रम घेण्यात आला. चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन टप्प्यातील लंडन हाऊसचा भव्य देखावा उभारण्यात आला होता. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या हस्ते डॉ. घुले, राजेंद्र गुंड, मनीषा सोनमाळी, बाळासाहेब साळुंके आदींची भाषणे झाली. मोठ्या संख्येने पदाधिकारी, भिमभक्त उपस्थित होते. सिद्धार्थनगर येथे नगराध्यक्ष प्रतिभाताई भैलुमे, कापरेवाडी वेस या ठिकाणी अजय भैलुमे मित्र मंडळ, म्हसोबा गेट येथे बबन भैलुमे, भांडेवाडीत दत्ता कदम, जिल्हा सहकारी बँक येथे रोहन कदम, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे नगरसेवक सतीश समुद्र यांच्यावतीने भव्य देखावे उभारण्यात आले होते. सायंकाळी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. यावेळी हजारो भीमभक्तांनी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले. देखावे पाहण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती.