Breaking News

कुळधरणला अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण


कर्जत/प्रतिनिधी: कुळधरण गटातील अंगणवाडी सेविकांना कुळधरणच्या अंगणवाडीत आकार प्रशिक्षण दिले जात आहे. एकात्मिक बालविकास विभागाच्यावतीने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण चार दिवस चालणार आहे. बालकांमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी सेविकांना आकार प्रशिक्षण दिले जात आहे. पर्यवेक्षिका लाढाणे यांच्याकडून हे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणात सेविका विमल चिंधे, सत्यभामा भारती, रईसा पठाण, वैशाली मारकड, कल्पना मांडगे, अलका गायकवाड, व्दारका लोखंडे, शितल निंबाळकर, रत्नमाला शिंदे, मनिषा चौरंगे, सुप्रिया कुलकर्णी, नगीना शेख, ललिता राऊत, सिंधु सुपेकर, स्वाती जाधव, मंगल गुंड, सोनल जगताप, लिलाबाई सुद्रिक, सिताबाई सुद्रिक, संगिता भोस, जयश्री पंडीत, सुमन परहर, रुपाली जंजीरे, तारा निक्षे, सुरवंता सोलनकर, अमृता भवाळ यांनी सहभाग घेतला.

नवीन अभ्यासक्रमानुसार तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी सेविकांना गटनिहाय आकार प्रशिक्षण दिले जात आहे. सेविकांना कृती व प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षित केले जात आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास करण्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग राबविले जात आहे.- शोभा तापकीर, प्रकल्प अधिकारी