Breaking News

पाथर्डीमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शस्त्रक्रिया शिबीर


पाथर्डी/प्रतिनिधी: पाथर्डी शहरातील कालिकादेवी मंदिर सभागृहात भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, श्रीराम मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप व के के आय बुधराणी हॉस्पिटलच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या ललिता शिरसाट, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, विष्णू बुगे, सतीश तरटे, हर्षद अन्नदात्ते, निलेश तुपे, किरण पुरी, वैभव खेडकर, शुभम नहार, अक्षय खेडकर, लक्ष्मण पावटेकर, शुभम राऊत, मनोज भागवत, सोनू त्रिमुखे, प्रसाद बाचल, पवन रोडी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी तर सूत्रसंचालन आदित्य चातुर यांनी केले.