Breaking News

राज्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता


अहमदनगर/प्रतिनिधी:१६ एप्रिल पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाटआणि गाराही पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगाळ वातावरण आणि वाढलेला उष्मा यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे काहीभागात हलका पाऊस पडला.

आता १६ एप्रिलपर्यंत आणखी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. याअवकाळी पावसाने आंबा बार , टरबूज, द्राक्षे आदी फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग या अवकाळी पावसाचाही वाट पाहत आहेत.