Breaking News

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राशीनला व्याख्यान


कर्जत/प्रतिनिधी: तालुक्यातील राशीन येथील गवळराण सायकरवस्ती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्यानिमित्ताने सत्यशोधक चळवळीचे अनुयायी अ‍ॅड.संभाजी बोरुडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. 

महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने सावता महाराज मंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला. सोनाळवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्य वंदना बेलेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. स्त्री-सक्षमीकरणात उद्देश महात्मा फुले यांचा होता. स्त्रीला एक आदराचे, सन्मानाचे स्थान मिळावे. यासाठी महात्मा फुलेंनी आयुष्यभर झगडत राहिले असे विचार बेलेकर यांनी मांडले. बोरुडे यांनी गौतम बुद्धांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत गुरुशिष्यांची परंपरा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सरपंच निलम साळवे, भिमराव साळवे शंकर देशमुख, विलास काळे, काळेवाडीचे सरपंच ज्योतीराम काळे, अ‍ॅड.युवराज राजेभोसले, दिपक थोरात, श्रीकांत सायकर, दयानंद आढावा, अमोल जाधव, श्रीकांत साळवे, अतुल साळवे, अ‍ॅड. हरिश्‍चंद्र राऊत, दिपक बेलेकर, मकरंद राऊत, माऊली सायकर आदी मान्यवर उपस्थित होते.