Breaking News

पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने फळ बागांचे नुकसान


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी, पुणेवाडी, वडनेर, सुपा, जामगाव, भाळवणी, कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्‍वर आदी काही भागात गारपीठसह जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात दि.14 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह गारपीठ सुरु झाली. अचानक गारपीठ सुरु झाल्याने सर्व शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ उडाली. सगळीकडे पाणीच पाणी पहावयास मिळाले. या अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा, डाळींब, कोथिंबीर, पिकांचे मोठे नुकसान झाले. 
 
तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीठ व अवकाळी पावसाने वनकुटे तास, भुलदरा, पठारवाडी, कान्हुरपठार, विरोली, टाकळी वडगाव, सावताळ, तिखोल या ठिकाणी अवकाळी पाउस व गारपीठ झाल्याने कांदा टॉमँटो डाळींब या पिकांचे मोठे नुकसान झाले. अचनाक झालेल्या पावसाने शेतकरी उध्वस्त झाला असून महसुल विभागाच्यावतीने तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. रात्री झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वनकुटे येथील बबन काळे यांचे 3 एकर डाळींब, 2 एकर टॉमँटो, 2 एकर वांगी, 2 एकर कोथींबिर, नारायण गागरे 2 एकर डाळींब, गोपीनाथ गुंजाळ 2 एकर डाळींब, गबाजी गुजाळ 4 एकर डाळींब, बाळु सगाजी डुकरे 2 एकर टॉमँटो, संतोष वाकळे 1 एकर डाळींब, रावसाहेब वाबळे 1 एकर डाळींब, जिजाबा पठारे 3 एकर डाळींब, नामदेव डुकरे 1 एकर डाळींब, लक्ष्मण पठारे 1 एकर टॉमँटो, शिवराम डुकरे 20 गुंठे, भाउसाहेब पठारे 3 एकर कांदा, सह अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करुन तातडीने मदत मिळावी असे आवाहन वनकुटा सरपंच राहुल झावरे, उपसरपंच बाबाजी गागरे, चेअरमन काशीनाथ बुचुडे, सुरेश नाना गागरे यांनी केले आहे.

अवकाळी पावसाने वनकुटे परिसरात मोठे नुकसान वनकुटे, चास, भूलदरा, पठारवाडी येथे गारपीठ पावसाने मोठ्या प्रमाणात कांदा, डाळींब, टॉमेटो या पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारपिटने दुष्काळात उभे आसणारे शेतकरी मेटाखुटीला आले. बबन काळे 3 एकर, 2 एकर टॉमेटो, 2 एकर वांगी, 2 एकर कोथिंबीर, नारायण गागरे 2 एकर, गोपीनाथ गुंजाळ 2 एकर डाळींब, गबाजी गुंजाळ 4 एकर डाळिंब, बाळू सगाजी डुकरे, 2 एकर टॉमेटो, संतोष वाबळे 1 एकर, जिजाबा पठारे 3 एकर डाळिंब, नामदेव विश्‍वनाथ डुकरे 1 एकर डाळिंब, लक्ष्मण हरिभाऊ पठारे 1 एकर टॉमेटो, शिवराम लालबा डुकरे 20 गुंठे, भाऊसाहेब कृष्णा पठारे 3 एकर कांदा बी, वरीलप्रमाणे शेतकर्‍यांचे नूकसान झाले आहे. त्यांना ताबडतोब पंचनामे करुन मदत मिळावी असे आवाहन सरपंच राहूल झावरे, उपसरपंच बाबाजी गागरे, चेअरमन काशिनाथ बुचूडे सुरेश, नाना गागरे असे अहवान केले आहे.