Breaking News

पंतप्रधानपदाच्या दाव्यावरून काँग्रेसचे 24 तासांत घूमजावनवीदिल्लीः राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारस्थापनेपासून रोखण्यासाठी प्रसंगी पंतप्रधानपदाचाही काँग्रेस त्याग करेल, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव गुलाम नबी आझाद यांनी केले होते; पण या विधानानंतर दुसर्‍याच दिवशी आझाद यांनी यूटर्न घेतला आहे. ‘काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाचा दावा करणार नाही, हे खरे नाही,’ असे ते म्हणाले.

आझाद म्हणाले, की काँग्रेस पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी इच्छुक नाही किंवा दावा करणार नाही, हे खरे नाही. काँग्रेस देशातला सर्वांत जुना राजकीय पक्ष आहे आणि जर पाच वर्षे सरकार चालवायचे आहे, तर साहजिक सर्वांत मोठ्या पक्षाला संधी मिळायला हवी. याआधी गुरुवारी गुलाम नबी आझाद म्हणाले होते, की काँग्रेसचे लक्ष्य कोणत्याही परिस्थितीत एनडीएला सरकार बनवण्यापासून रोखणे हे आहे. जर आघाडीत काँग्रेसला पंतप्रधानपद मिळत नसेल तरी कोणतीही हरकत नाही.