Breaking News

पाणी भरण्यावरून दोन गटात हाणामारी 40 जणांवर गुन्हे दाखल ; 14 अटक


जामखेड/प्रतिनिधी
शहरात पाणी टंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची भांडणे टोकाला जावू लागली आहेत. दि.9 मे रोजी शहरात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी सुमारे 40 जणांविरोधात परस्परविरोधी फिर्यादी नुसार जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील कुंभाळतळे परिसरात राहणार्‍या डोकडे व बागवान या दोन परिवारामध्ये नळावर पाणी भरण्यावरून किरकोळ वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसन मोठ्या वादात झाले. दोन्ही गटांनी मंडळी जमवून हाणामारी केली. या हाणामारीत फिर्यादी पुष्षा रोहिदास रोकडे (रा. डूचे किराणा कुंभाळतळे जामखेड) यांची नणंद व त्यांची मुलगी हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.तर या प्रकरणातील दुसर्‍या फिर्यादी शाहिन अजिज बागवान (रा.बागवान मस्जिद जामखेड) यांचे दिर याकुब अकबर बागवान यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण झाल्याने तेही जखमी झाले आहेत.
दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनला डोकडे व बागवान या दोन्ही कुटूंबांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही गटातील 40 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बंड्या उर्फ अबूजर अजीज बागवान, शाहिन अजीज बागवान, रेश्मा बागवान, अस्लम बागवान, पप्पु शेख, तबरेज बागवान, रईस बागवान, फिरोज सय्यद, आयुब बागवान, साहिल मैनुद्दीन सय्यद, आय्यास वजीर बागवान, अजिज अकबर बागवान, फिरोज अकबर बागवान, आयेशा आय्यास बागवान, यांच्यासह अनोळखी 3-4 जणांविरोधात पुष्पा रोकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तर शाहिन अजिज बागवान यांच्या फिर्यादीवरून बाळू डोकडे, यांची पत्नी व मुलगी (नाव माहीत नाही), राजू डोकडे नितीन डोकडे, रोहित पवार, आकाश डोकडे, योगेश डोकडे, सागर मोहळकर, राजू फूलमाळी, सुभाष फूलमाळी, सूरेश फुलमाळी, सुरज पवार, सचिन डोकडे ( सर्व रा.जामखेड ) सूदाम बाळु भिसे (रा.बटेवाडी, अंकूश बुवासाहेब काळे (रा.अळजापुर ता. करमाळा ) यांच्यासह इतर अनोळखी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात दोन्ही गटातील सुरज अभिमान पवार, राजु गोपीनाथ डोकडे, सुदाम बाळु भिसे, अंकुश बुवासाहेब काळे, काजल डोकडे, पुष्पा रोहीदास डोकडे, अबुजर अजिज बागवान, साहिल मैनुद्दीन सय्यद, फारूख मैनुद्दीन सय्यद, आय्यास वजीर बागवान, फिरोज अकबर बागवान, आयेशा आय्यास बागवान, शाहिन अजिज बागवान, अजिज अकबर बागवान या 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करत आहेत.

पोलिसांनी मागवला अतिरिक्त बंदोबस्त
दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी 37 (1) (3) नुसार जारी केलेल्या जमावबंदीच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणीही दोन्ही बाजुच्या आरोपींविरोधात कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाणी भरण्याच्या कारणावरून झालेली भांडणे पोलिसांनी गांभीर्याने घेत पाण्याचे राजकारण टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवून शहरात तैनात केला आहे.