Breaking News

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला सुरूवात


कोल्हापूर : कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा रविवारपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली होती. त्याचबरोबर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू होत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर विमानतळावरुन दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-तिरूपतीसाठी पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे. तिरूपतीसह कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर ‘इंडिगो’ कंपनीकडून विमानसेवा सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या विमानसेवेबरोबर कोल्हापूरचीही विमानसेवा विस्तारत असून, यापुढे कोल्हापूर विमानतळावर दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर दोन सेवा उपलब्ध होणार आहेत.

‘उडान’अंतर्गत कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीला, तर कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रू जेट आणि घोडावत ग्रुपच्या ‘स्टार एअर’ला मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील स्लॉटच्या अडचणीमुळे ट्रू-जेटची, तर धावपट्टीमुळे ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. रविवारी सकाळी 9.45 मिनिटांनी हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर या पहिल्या फ्लाईटचे आगमन होईल. यानंतर सकाळी 9.45 मिनिटांनी कोल्हापूर-तिरूपतीसाठी विमान हवेत झेपावेल. तिरूपतीहून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी विमानाचे कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल. दुपारी दीड वाजता ते हैदराबादसाठी टेक ऑफ होणार आहे.