Breaking News

आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात


म्हसवड / प्रतिनिधी : अक्षय तृतियानिमित्त येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षयतृतियानिमित्त मंदीरात उसाच्या रसाचा श्री.1008 अदिनाथ भगवंत मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर येथील भारतीय जैन समाज संघटनेच्या वतीने जैन मंदिरासमोर सुमारे एक टन ऊसाचा ताजा रस प्रसाद म्हणून जैन धर्मिय श्रावक-श्राविकांसह येथील नागरीकांना वाटप करण्यात आला. 

यावेळी भारतीय जैन संघटेच्या म्हसवड शाखेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मोडासे,सचिव अभिराज गांधी महिला अध्यक्षा सौ.योगिता गांधी. सचिव सम्रध्दी व्होरा आदी उपस्थित होते.