Breaking News

वैद्यकीय प्रवेश प्रकरणी अध्यादेश काढणार मंत्रिमंडळाचा निर्णय; अध्यादेशाला आव्हान देणार

मराठा समाजाच्या पीजी मेडीकलचा तिढा सुटण्याची चिन्हं, सरकार अध्यादेश काढणार

 मुंबई / प्रतिनिधीः मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रकरणी अध्यादेश काढण्यावर आज राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. मंत्रिमंडळ बैठकीत अध्यादेशाच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. राज्यपालांची स्वाक्षरी होताच अध्यादेश जारी केला जाणार आहे. ज्याचे प्रवेश झाले आहेत; त्यांचा विषय हा अध्यादेशमुळे संपला आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाला 25 मे ची प्रवेशाबाबतची मर्यादा 31 मे पर्यंत वाढवून द्यावी म्हणून विनंती करणार आहोत. मेडिकललच्या 213 जागा वाढवून देण्याची मागणी आपण करणार आहोत. 21 तारखेला याबाबत बैठक आहे, इतर राज्यांचीही मागणी आहे, तेव्हा वाढीव सीटबाबतही निर्णय होईल, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे; परंतु प्रवेश कायम झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मराठा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश रद्द झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न आणि तातडी पाहता वटहुकूम काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अध्यादेश निघाला, तरी खुल्या गटातील काहींनी पूर्वीच्याच मुद्द्यावर या अध्यादेशाला आव्हान देण्याचा पवित्रा घेतल्याने मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबाबतच्या अडर्चीी संपायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालय आव्हान अर्जावर काय निर्णय घेणार, यावर मराठा विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रवेश अवलंबून असणार आहेत.