Breaking News

पिक विमा मिळण्यासाठी गायकवाड यांनी घेतली पवारांची भेट


पारनेर/प्रतिनिधी: खरीप 2018 मृगबहार डाळिंब व इतर फळपिकांचा विमा मिळण्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहिले होते. त्या सर्व शेतकर्‍यांच्यावतीने सभापती प्रशांत गायकवाड यांनी शरद पवार यांना आज बारामती येथे भेट निवेदन घेऊन दिले. 

विमा मिळण्याकामी संबंधित विमा कंपनी, राज्य शासन व केंद्रशासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची आवश्यक आहे. तसेच दुष्काळ ग्रस्त शेतकर्‍यांना विमा मिळणे किती गरजेचे आहे. याची माहिती दिली. सध्या पारनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून 47 चारा छावण्यामध्ये 29 हजार जनावरे आहेत. त्यापैकी टाकळी ढोकेश्‍वर व सिद्धेश्‍वरवाडी येथील चारा छावण्या या कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर हे चालवत आहेत. या दुष्काळी परिस्थितीवर शासना मार्फत उपाय योजना करण्याबाबत बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी शरद पवार यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी राज्यशासनाचे अधिकार्‍यांची पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढू व शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळून देण्यात येईल असे आश्‍वासन पवार यांनी गायकवाड यांना दिले.