Breaking News

विरंगुळ्यासाठी क्रिकेट स्पर्धा आरोग्यदायी : महापौर वाकळे

संबंधित इमेज
अहमदनगर /प्रतिनिधी : “टुर्नामेंटच्या माध्यमातून सर्व क्रिकेटप्रेमींना पर्वणीच मिळत असून आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत विरंगुळा मिळण्यासाठी अशा स्पर्धा आरोग्यदायी ठरु शकतील. पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने समाजातील युवकांना संघटीत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेमुळे युवकांना हक्काचे मैदान उपलब्ध झाले असून त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य संयोजकांना करु’’, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर जय मार्कंडेय चषक 2019 भव्य टेनिसबॉल टुर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 10 दिवस चालणार्‍या या टुर्नामेंटचे उद्घाटन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते हवेत फुगेसोडून व चेंडू टोलवून केले.
यावेळी उद्योजक श्रीनिवास रासकोंडा, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस महेश सब्बन, राजू मंगलारप, रवी दंडी, सुमित इपलपेल्ली, दीपक गुंडू, अजय म्याना, गोपाल न्यालपेल्ली, योगेश म्याकल, अंकुश बुरा, गणेश इपलपेल्ली, संजय मंचे, पाप्या गुरुड, जय बोगा, तिरीमल पासकंटी, विकी अनमल आदींसह खेळाडू उपस्थित होते. टी-20 स्पर्धेच्या नियमाप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक सामना 8 षटकांचा ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील 46 संघांनी सहभाग घेतला आहे.
प्रास्तविकात महेश सब्बन म्हणाले, “ पद्मशाली समाजातील युवक कष्टकरी असून मनावरील ताण-तणाव कमी व्हावा व पद्मशाली समाजातील युवकांना संघटीत करण्यासाठी पद्मशाली युवा शक्ती वर्षभर विविध उपक्रम राबवत आहे. जय मार्कंडेय क्रिकेट स्पर्धा यातील प्रमुख उपक्रम आहे.’’
सूत्रसंचालन दिपक गुंडू यांनी केले तर आभार सुमित इपलपेल्ली यांनी मानले.