Breaking News

खानापूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा


विटा / प्रतिनिधी : विटा शहरासह खानापूर तालुक्यामध्ये राजरोसपणे मटका, गुटखा आणि अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे तरूणपिढी व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे अनेकांची कुटुंबे उध्दवस्त होत आहेत. अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने विटा शहरासह तालुययात सुरू असणारे सर्व अवैधधंदे बंद करण्याची मागणी समतावादी महासंघाने सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. बी. काटे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवैध धंदे करणार्या लोकांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे विटा शहरासह खानापूर तालुक्यामध्ये राजरोसपणे मटका, गुटखा आणि अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे तरूणपिढी व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे अनेकांची कुटुंबे उध्दवस्त होत आहेत. अवैध धंदे राजरोस सुरू असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झालेली आहे. शहरातील अनेक पानटपर्यांवर राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. ठिकठिकाणी मटका घेतला जात आहे. 

तसेच अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने असे अवैधधंदे करणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

यावेळी समतावादी महासंघाचे राज्य संघटक गणेश माने, पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश ऐवळे, दिनकर वायदंडे, विलास होनमाने, वाल्मिकी सवने, रावसाहेब कांबळे, हणमंत खिलारे, अविनाश कोळी, धनाजी खिलारे, सागर भिंगारदेवे, अशोक खिलारे यांच्यासह समतावादी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.