Breaking News

तिसरी आघाडी अशक्य : एम.के. स्टॅलिन


चेन्नई : विविध प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी उभारण्याच्या के चंद्रशेखर राव यांच्या अभियानाला आज धक्का लागला आहे. सध्या विविध राज्यांच्या दौर्‍यावर असलेली तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल द्रमुक चे सर्वेसर्वा स्टॅलिन यांची भेट घेतली. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

काल चंद्रशेखर राव यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना एम.के. स्टॅलिन म्हणाले की, राव यांच्या भेटीत राजकीय असे काही नसून ती एक सौजन्य भेट म्हणून पाहावी. तेलंगणचे मुख्यमंत्री तामिळनाडूत देवदर्शनासाठी आले असून कोणतीही आघाडी स्थापन करण्यासाठी नाही. राव यांच्या काँग्रेस- भाजपा मुक्त तिसर्‍या आघाडी बाबत बोलताना स्टॅलिन म्हणाले की, तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असे वाटत नाही पण, 23 मे नंतर चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले. विशेष म्हणजे स्टॅलिन यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत युती केली आहे, तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर मान्यता सुद्धा दिली होती. यापूर्वी राव यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांची भेट घेऊन तिस-या आघाडीबाबत चर्चा केली होती.