Breaking News

...तर बारामतीमध्ये जानकर जिंकले असते!


कोळकी / प्रतिनिधी : गेल्या वेळी महादेव जानकर बारामतीमधून थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यावेळी त्यांनी कपबशी ऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर पंधरा ते वीस हजार निवडून आले असते. अशी टिपणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवंडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागल्याचे दिसत आहे. नेतेमंडळी दुष्काळ दौर्‍याच्या नावाखाली मतदार संघ तसेच जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी पाहणी करून चाचपणी करीत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर ,सातारा जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला आहे. त्यानंतर त्यांनी आता बीडमध्ये दुष्काळी दौरा करत आहेत. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हेही दुष्काळ दौर्‍यावर निघाले आहेत. काल रात्री उशिरा दुष्काळी पाहणी दौर्‍यावर असलेल्या आठवल्यांनी सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील चारा छावणीला भेट देऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली आणि शेतकर्‍यांशी बोलताना पवार यांची चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले की शरद पवार मोठे नेते असले तरी लोकांच्या मनात बारामतीत बदल घडवायचा विचार असू शकतो आणि म्हणूनच बारामतीची जागा जाणार असल्याचे दिसू लागल्याने पवारांनी मशीन वर टीका सुरू केली आहे.

गेल्या वेळी महादेव जानकर बारामती मधून थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यावेळी त्यांनी कपबशी ऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर पंधरा ते वीस हजार मतांनी निवडून आले असते.