Breaking News

सारूळ येथिल 132 केव्ही विद्युत केंद्राच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात


ना.पंकजाताई मुंडे यांच्यामुळेच प्रश्‍न मार्गी-विजयकांत मुंडें

केज । प्रतिनिधीः-
सारूळ येथिल 132 केव्ही विद्यूत केंद्राला ऊर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या बैठकीत मंजुरी मिळाली आसुन प्रत्यक्ष कामाला तातडीने सूरुवात करण्याच्या  सूचना महापरेषाचे संचालक चव्हाण यांना देण्यात आल्या असल्याची माहिती जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी दिली आहे.
केज तालुक्यातील मौजे सारुळ येथे 132 केव्ही विद्यूत केंद्राचा प्रश्‍न आनेक वर्षांपासून प्रलंबित होता.या ठीकाणी विद्युत केंद्र व्हावे अशी येथिल जनतेची सतत मागणी होती. जनतेची आणी परीसरातील शेतकर्यांची मागणी व जिव्हाळ्याचा प्रश्‍न तसेच विडा, येवता, देवगाव, मस्साजोग, नांदुरघाट, वाघेबाभूळगाव, राजेगाव या गावातील सबटेशनला उच्च दाबाने वीज पुरवठा होऊन या भागातील लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले होते. अखेर मंगळवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मंञालयातील दालनात बैठक पार पडली.या बैठकीत केज तालुक्यातील सारूळ येथिल 132 केव्हीच्या विद्युत केंद्राच्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ मंजूरी देऊन संबंधित महापरेषाचे संचालक चव्हाण यांना तात्काळ निविदा प्रक्रिया करून तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याच्या सुचनाही देण्यात आल्याने जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले आसून परिसरातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न मार्गी लागल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

सारुळ येथे 132 केव्ही विद्युत केंद्र व्हावे अशी जनतेची मागणी असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित प्रश्‍न  निकाली काढल्याने या भागात आत्ता उच्च दाबाने विद्युत पुरवठा होऊन जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे.
विजयकांत मुंडे
(जि.प.सदस्य बीड)