Breaking News

अतिक्रमित रस्ता खुला करून देण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

कोळगाव/प्रतिनिधी
शासकीय जागेत अतिक्रमण करून शासकीय रस्ता बंद केल्याने दररोजच्या वहिवाटेस अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकरणी तहसीलदारांशी वेळोवेळी पाठपुरावा करूनही रस्ता खुला करून मिळत नाही. असा आरोप करत शेडगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

  तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मेहेत्रे वस्ती, भुजबळ वस्ती, वाघ वस्ती, नवले वस्ती आणि जमदाडे वस्ती येथे अनेक लोक घरे बांधून रहात आहेत. सदर ठिकाणी ये जा करण्यासाठी उंबर ओढ्यातून रस्ता होता. परंतु शेडगाव येथील गट न ३६७,३६८आणि ४७१ यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेजारून जाणार शासकीय रस्ता अतिक्रमण करल्याने रस्ता पूर्ण बंद झाला आहे. या मुळे आम्हास रस्ताच राहिला नसल्याने दैनंदिन जीवन जगण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. असे तहसीलदार यांचे वेळोवेळी लक्ष वेधले असताना सुद्धा त्यानी याची तातडीने दखल घेतली नाही म्हणून आम्हास उपोषण करण्याची वेळ आली आहे. उपोषणास सुनील वाघ, मघुकर मेहेत्रे, आबा मेहेत्रे, शरद मेहेत्रे, रामदास नवले, झुंबर जमदाडे, नामदेव मेहेत्रे, राहूल मेहेत्रे, शिवाजी मेहेत्रे,राजेंद्र चव्हाण आदी शेतकरी बसले आहेत.