Breaking News

चौघांना प्यायला लावली लघवी

गोतस्करीचा आरोप; मारहाण करतानाचा व्हिडिओ

चंदीगड
हरयाणातील फतेहाबादमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून चौघांना मारहाण करण्यात आली. फतेहाबादमध्ये गावदैयडमध्ये चार लोकांना मृत गायीची तिच्या वासराची कत्तल करताना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांचे कपडे काढून मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर आरोपींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही आरोपींविरोधात गो संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस आता चौकशी करत आहेत. मारहाणीत चारही जणांना किरकोळ जखम झाली आहे. पोलिसांनी मृत गाय आणि वासरू पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. दलित अधिकार मंचने मारहाण करणार्‍यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. दलित अधिकार मंचचे संजोयक बेगराज सिंह यांनी मारहाण करण्यात आलेले चारही लोक मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम करतात, असे सांगितले. सर्वजण दलित समाजातून असल्याची माहिती त्यांनी दिली.