Breaking News

'लक्ष्य'... वाणिज्य शाखेतील करिअरचे

 शालांत परीक्षेनंतर विद्यार्थी आणि संयोगाने त्यांच्या पालकांसमोर यक्ष प्रश्न उभा असतो,  तो म्हणजेच योग्य करियर निवड. साधारणपणे, अलीकडील काळात वाणिज्य शाखेत करिअरचा अर्थ म्हणजे केवळ सीए करने असा लावला जातो. पण हे पूर्ण सत्य नाही आहे. नोकरी पेक्षा व्यवसायीक दृष्टिकोन असलेला कुठलाही सर्वसामन्य विद्यार्थी वाणिज्य शाखेत अपेक्षित यश प्राप्त करु शकतो. त्यासाठी पालक आणि विद्यार्थी या दोनही घटकांनी खाजगी शिक्षण संस्था आणि क्लासेसच्या जाहिरातींना बळी न पडता या शाखेतील करिअर विषयक सखोल माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.

   विवेकशील पालक वर्गाने एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आपण आपल्या पाल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांचे भांडवल करण्याचे काम विशिष्ट शैक्षणिक व्यापारी वर्गाकडून केले तर जात नाहि ना ? याची  काळजी घ्यावी. सीए , सीएस कींवा सीएमए य़ा सारख्या व्यावसायिक परीक्षेचा विचार करताना जाहिराती व आर्थिक बाजू विचारात घेण्यापेक्षा पाल्याची मानसिकता व इयत्ता दहावीतील गणित , इंग्रजी विषयातील गुण तापासावेत. पाल्याची दिवसातून कमीत कमी 10 ते 12 तास अभ्यास करण्याची तयारी असेल तरच पालकांनी वेळ आणि पैसा खर्च केला पाहिजे.

   साधरणपणे , वाणिज्य शाखेतून ग्रॅजुएशन , पोस्ट ग्रॅजुएशन करताना आपण जनसंपर्क (मास मीडिया  ) , किरकोळ व्यवस्थापन (रीटेल मॅनेजमेंट ), विदेशी व्यापार व्यवस्थापन ( फॉरेन ट्रेड मॅनेजमेंट) , गुंतवणूक व्यवस्थापन (इनवेस्टमेंट मॅनेजमेंट ), बँकिंग अँड फाइनान्स य़ा सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विषयात विशेष प्राविण्य मिळवता येते . नेट सोबत पीएचडी ( फाइनान्स ) ही सीए ला समांतरच आहे. या शिवाय बीबीए ( सीए ) करून एमबीए केल्यास खाजगी क्षेत्रात करिअरचि मोठी संधि उपलब्ध होऊ शकते . या सोबत इन्शुरन्स , बँकिंग , फेशन डिज़ाइन , मार्केटिंग ,  टुरिसझम  , मॅनुफॅक्चरिंग, हॉटेल मॅनेजमेंट सारखे क्षेत्रही खुली आहेत ज्यामध्ये मोठ्या स्तरावर काम केलें जाऊ शकते त्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ मानसिकता बदलण्याची गरज आहे.

 करीअर निवडीत पालक , पाल्य आणी शिक्षक या तिन घटका मधे योग्य समन्वय असायला हवा. योग्य मानसिकता , चांगले शैक्षणिक  मार्गदर्शन आणी कष्ट घेण्याची तयारी असेल वाणिज्य शाखेतील  कुठलाही सर्व सामन्य विद्यार्थी अगदी राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर अगदि सहज काम करून हजारो रोजगार निर्माण करू शकतो . गरज आहे ती फ़क्त पगार घेण्यापेक्षा पगार देण्याच्या विचाराचि . यशस्वी करीअर घडण्याच्या प्रक्रियेत पुस्तकी ज्ञाना पेक्षा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचा मोठा वाटा असतो, हे लक्षात घ्यायला हवे .

  आपल्याला वाणिज्य शाखेतील  करीअर विषयक कुठलीही माहिती हवी असेल , शंका असतील तर आपले स्वागत आहे . प्राध्यापक . प्रसाद पाटसकर ( 17 वर्ष अनुभव ) संचालक :  पाटसकर इन्स्टिट्यूट ऑफ़ कॉमर्स , लक्ष्य अकाउंट्स क्लासेस , शिवाजी नगर , केडगाव , अहमदनगर या ठिकाणी प्रत्यक्ष भेटू शकता. किंवा  8149399725 या व्हाट्सअप नंबर वर आपल्या शैक्षणिक समस्या मेसेज करा. आपल्याला आमच्याकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल .

  दर्जात्मक शिक्षणावर भर देणाऱ्या महाविद्यालयामधे प्रवेश घ्या आणि फेब्रुवारी , 2021 मध्ये होणाऱ्या इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेची तयारी करा. हा नवीन शैक्षणिक प्रवास आपल्याला नक्कीच इच्छित उद्दिष्टांपर्यंत घेऊन जाईल यात कुठलीच शंका नाही.