Breaking News

शिंदे यांनी पवार साहेबांकडे उमेदवारी मागावी माझ्याकडे नाही : भुजबळ

धूळगावात खडाजंगी झाल्यानंतर भुजबळांनी शिंदे समर्थकांना संतापून दिले उत्तर

येवला/प्रतिनिधी
तालुक्याचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या मतदारसंघाच्या दौर्‍यावर आहे आज जळगाव येथे पालखेड डावा कालव्याचे गेटचे उद्घाटन केले यावेळी येथील विजेचा प्रश्‍न ही सोडू येणार्‍या काळात लवकरच मांजर पाण्यासारख्या प्रकल्पाचे काम देखील मार्गी लावू असे भुजबळ यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले याचप्रमाणे काही ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन तर काही ठिकाणी उद्घाटनाचे काम चालू आहे. हे सर्व जरी राष्ट्रवादीसाठी आशादायी असलं तरी प्रत्येक गावांमध्ये भुजबळ भेटीगाठी देत असताना सध्या त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचं कारणही तसं मोठं आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी द्या, अशा आशयाचे पत्र प्रसारमाध्यमांमधून भुजबळांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला; परंतु याचा इफेक्ट इतका प्रचंड झाला आहे की ज्या गावात भुजबळ जात आहे त्या त्या गावात शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. काल शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या संभाजी पवार यांच्या बालेकिल्ल्यात होते यावेळी येथे कार्यकर्ते न जमल्यामुळे तेथेही प्रतिसाद न मिळाल्यामुळे बाहेरगावीच्या असलेल्या लोकांची उपस्थिती असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होते. त्यातच नागडे बल्हेगाव बोरगाव आडगाव येथेही भुजबळ गेले असता तिथेही शिंदे समर्थक आडवे झाले होते. भुजबळ यांचे उद्घाटनाचे काम होऊ देतात सभाही शांततेतच होतात. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे समर्थक भुजबळ यांना सांगता की या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी द्या, असे निवेदन देत शिंदे समर्थक थेट भुजबळ यांना आव्हान देत आहे.
आज सकाळी ते येथील गेटचे उद्घाटन दरम्यान आले होते. यावेळी येथील शिंदे समर्थकांनी भुजबळ यांचे भाषण संपल्यानंतर प्रचंड गोंधळ घातला यामध्ये भुजबळ यांना थेट सांगण्यात आले की, आता तुम्ही थांबून घ्या. आमच्या भाऊंना म्हणजे शिंदे यांना उमेदवारी द्या लोक तुमच्या बरोबर नाही असं देखील शिंदे समर्थक सांगायला विसरले नाही तर शिंदे यांनी तुम्हाला वाईट काळात फार मोठी साथ दिली आहे. त्याच गोष्टीचा विचार करून तुम्ही आता तुमची उमेदवारी थांबून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी द्या. असं उघडपणे शिंदे समर्थक भुजबळ यांना सांगत आहे. धुळगाव येथे बोलतांनी अक्षरशः शिंदे समर्थक व भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी झाली. भुजबळ यांना सांगितले की, तुमच्या विरोधात सध्या लोक आहेत यावर भुजबळ चिडले त्यांनी लगेच उत्तर दिले की, तुम्ही मला जे सांगत आहे ते मला माणिकराव शिंदे यांनी सांगावं मग बघू काय करायचं. ते तसेच शिंदे यांनी पवार साहेबांकडे उमेदवारी मागावी ते ठरवतील काय करायचं ते, असे उत्तर देऊन भुजबळ यांनी धुळगाव येथून काढता पाय घेतला. यानंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. दोघा येथील दौरा आटोपल्यानंतर  भुजबळ  चिचोंडी खुर्दच्या दौर्‍यावर होते. इथे अक्षरश: पब्लिक न जमल्यामुळे चिचोंडी बुद्रुकमधून काही लोकांना बोलावून आणावे लागले.
येथील सरपंच मनिषा मढवई, उपसरपंच चांगदेव देवडे यांच्यासह 11 सदस्य गावातील प्रमुख कार्यकर्ते यांनी भुजबळ यांच्या कार्यक्रमाकडे सपशेलपणे पाठ फिरवली आहे. या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वाद चव्हाट्यावर येत आहे. या सर्व प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. आता हा प्रश्‍न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोडवता की छगन भुजबळ की हा संघर्ष अजून काही टोकाला जातो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यामुळे भुजबळ यांच्या विरोधी गटाच्या हातात मात्र आयतं कोलीतच मिळालं आहे.
यावेळी भुजबळ यांच्या दौर्‍यात सोबत जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन अरुण थोरात, सोनवणे, मोहन शेलार, वसंत पवार आधी पदाधिकारी होते तर धुळगाव येथे अण्णासाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सुभाष नाना गायकवाड, राजेंद्र गायकवाड, पांडुरंग गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, निलेश महाले, नारायण गायकवाड, माजी सरपंच कैलास खोडके, बापूराव सोनवणे, दत्तू पाटील सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, रामेश्‍वर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, परशराम सोनवणे, उत्तमराव गायकवाड, भगवान गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.