Breaking News

गोदावरी बायोरिफायनरी कर्मचार्‍यांच्यावतीने शिक्षणमंत्र्यांचा सत्कार

 कोपरगाव ता/प्रतिनिधी  
 कोपरगाव तालुक्यातील वारी साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लि.या कारखान्याच्या कामगार प्रतिनिधी मंडळाने वारीचे सरपंच सतिश कानडे यांच्या समवेत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची मुंबई येथे भेट घेतली. व गावाच्या तसेच कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी उपस्थित कामगारांना आशिष शेलार यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
 भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनांच्यावतीने कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली. त्याबद्द्ल आशिष शेलार यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास कामगारसंघटनेचे सचिन टेके पाटील, वाहेद खान पठाण, सुनिल महाले, महेश वालझडे, अनिल सिंग, प्रकाश येशी, संतोष जगताप, हेमराज प्रसाद, सोमनाथ थोरात, शेखनूर शेख, बाळासाहेब वरकड, गौतम मोरे यांच्यासह असंख्य कामगार नेते व कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते.