Breaking News

महसूल मध्ये भूकंप ;उपजिल्हाधिकारी सह दोन तहसीलदार निलंबित

बीड  | प्रतिनिधीः-
कामात हलगर्जीपणा, दुष्काळाकडे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे बीडच्या उपजिल्हाधिकार्‍यासह दोन तहसीलदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी पाठवला आहे, या कारवाईमुळे महसूल प्रशासन हादरून गेले आहे .
बीड येथे रुजू होण्यासाठी धडपड करणारे आणि रुजू झाल्यानंतर आपल्या कामात प्रचंड निष्काळजीपणा करणारे वैराग्य आल्यासारखे वागणारे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आदेश न पाळणारे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दुष्काळ निवारणाच्या कामांमध्ये जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून कामच केले नाही त्यामुळे चारा छावण्यांमधील घोटाळे असतील किंवा इतर गोष्टींमुळे जिल्हाधिकार्‍यांना वरिष्ठांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले त्याचबरोबर गौण खनिज प्रकरणात देखील त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून आले तसेच बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी तर चक्क आपले नातेवाईक असणार्‍या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना चारा छावणी मध्ये घोटाळा करण्यासाठी मदत केल्याचे समोर आले होते त्याचबरोबर पुरवठा विभागाच्या गोदाम व्यवस्थापक तातडीने कारवाई करण्याचे आदेश चिंते यांना दिलेले असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी पाठवला आहे तसेच पाठवण्याच्या वादग्रस्त तहसीलदार ज्यांनी पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल केले होते तसेच वाळू धान्य घोटाळे करणार्‍या माफियांकडून लक्ष्मी दर्शन करून घेणार्‍या तहसीलदार रूपा चित्रक यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी पांडेय यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाठवला आहे एकाच वेळी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्याची की ही ही महसूल इतिहासातील पहिलीच घटना असावी