Breaking News

विवाहितेवर बलात्कार;गुन्हा दाखल

राहुरी/प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळीमिया परिसरातील २४ वर्षीय विवाहितेवर मामाच्या मुलानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरी कार्यक्रमास घेऊन जायचे आहे असे सांगून तिला दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी: मामाच्या गावाला कंदुरीच्या कार्यक्रमास घेऊन जातो असे विवाहितेच्या पतीस सांगून तिला तिच्या मामाच्या मुलाने ४ एप्रिल २०१९ रोजी सोलापूर जिल्ह्यात नेले. तिथे तिला दमबाजी करत मारहाण करुन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

याबाबत पीडितेने राहुरी पोलिसांत गुन्हा रजि नंबर  ४३३|२०१९ भादवी कलम ३७६,३२३,५०६, प्रमाणे  सचिन नामदेव नन्नवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शानाखाली ए.पी.आय यशवंत राक्षे करत आहेत.