Breaking News

४५ वर्ष जुना पुल खचण्याच्या मार्गावर,मुठीत जिव घेवुन पार करावं लागतो पुल

परळी वैजनाथ| प्रतिनिधीः-
परळी शहरातुन अनेक गावांना जाणार्‍या रस्त्याच्या नदीवरील जुना पुल कोसळण्याच्या स्थितित आला असुन जि.प.च्या बांधकाम विभागाने काही अनुचित दुर्घटना घडण्या अगोदर या पुलाचे नुतनिकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गातुन होत आहे. शहरातील भिमनगर भागातुन काळरात्रीदेवी मंदिर समोरून वैजवाडी,मांडवा ,मिरवट,कासारवाडी व अनेक वाडी,ताड्यांकडे जाणारा रस्ता असुन याच रस्त्यावर घनशी नदीवर पुल असुन तो बांधुन तब्बल ४५वर्ष झालीआहेङ्गआज स्थितिला सदर पुलाची अनेक ठिकाणी पडझड झाली असुन हा पुल कधीही पडू शकतो अशी शक्यता सदर पुलाची स्थिती पाहता निर्माण झाली आहे.या रस्त्याने गावकरी,विद्यार्थी यांची परळीत ये,जा असते तर परळीतील काहीचीं शेती घनशी नदीच्या पलीकडे असल्याने त्यांचा राबता सुध्दा याच रस्त्याने व याच पुलावरून रोज होतो.सदर पुल कोसळुन काही अनुचित प्रकार घडण्या अगोदर जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाने या पुलाचे लवकर नुतनिकरण करावे अशी मागणी शहरातील नागरिक, ग्रामस्थ,विद्यार्थी व शेतकरी वर्गातुन होत आहे.

ना.पालकमंत्र्यांच्या परळी मतदार संघात असे,तर जिल्ह्यात असणार कसे
सदर रस्ता हा ना.पंकजाताई मुंडे यांच्या होमपिच असणार्‍या परळी शहरातुन जातो व परळी मतदार संघात मोडतो.व त्यांच्याच भागात हि अवस्था असेल तर जिल्ह्यात कसे असणार असे बोलले जात आहे.ना.पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कोटी मंजुर करून दिले जि.प.ला सुध्दा कोट्यावधी रूपये विविध विकास कामासाठी शासनाकडुन मंजुर करून घेतले तरी परळी शहराजवळील पुलाकडे जि.प.च्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याचें दुर्लक्ष कसे झाले सदर पुल बांधुन ४५वर्ष झाली तरी या पुलाचे  नियमाप्रमाणे नुतनिकरण  जि.प.च्या बांधकाम विभागाने केले नसल्याने त्याचा परिणाम आज स्थितिला समोर असुन गेल्या ४५वर्षात या पुलाच्या दुरूस्तीसाठीङ्गअथवा नुतनिकरणासाठी किती निधी जि.प.तर्फे मंजुर झाला होता किंवा आज,पर्यंत या पुलासाठी निधीच  मंजुर केला गेला नाही याचा खुलासा जनतेला  होणे जरूरीचे असुनआता सत्तेत असणार्‍या जि.प. अध्यक्ष,बांधकाम सभापती यांनी तपासले पाहिजे असा सुर देखिल नागरिकातुन उमटत आहे. सदर पुलाविषयी जि.प.च्या बांधकाम विभागाचे अंबाजोगाईचे डेपुटी इंजिनियर नागरगोजे यांच्याशी सपर्ंक साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क होवु शकला नाही.तर सदर पुल कोसळुन काही अघटीत घटना घडण्याच्या अगोदर यापुलाचे नुतनिकरण लवकर करावे अशी मागणी शहरातील नागरिक ग्रामस्थ ,विद्यार्थी व शेतकरी वर्गातुन होत आहे.