Breaking News

पीक विमा लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर-आ.कोल्हे

कोपरगाव ता/प्रतिनिधी
 कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांनी शासनांच्या पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना 2018 मृग बहारमध्ये फळबागेचा विमा उतरविला होता. मात्र, त्यातील काही शेतकर्‍यांना त्यांची रक्कम मिळाली नव्हती, ती मंजुर झाली असून शेतकर्‍यांच्या खात्यावर लवकरच ही रक्कम वर्ग होईल, अशी माहिती आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
   त्या म्हणांल्या की, चालू वर्षी असलेली दुष्काळी स्थिती त्यात शेतकर्‍यांनी फळबाग विमा उतरविला होता. राज्यातील युती शासनाने या फळबागांना पीक विमा मंजूर केला होता. मात्र, त्यातील वंचित शेतकर्‍यांबाबत शासन, राज्याचे मुख्यमंत्री, महसुलमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री व कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे सातत्यांने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात बैठकही घेण्यात आली. त्यानुसार शासनाचे उपसचिव डॉ. किरण पाटील यांनी शासन निर्णय प्रक्र 8/10 ए दि.13 जुन 2019 रोजी निर्णय घेवून ज्या शेतकर्‍यांची फळपीक विमा योजना मृग बहार रक्कम यापुर्वी मंजुर झाली नव्हती. ती मंजूर केली असून ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच वर्ग केली जाईल, असेही शासनांने स्पष्ट केले आहे. दुष्काळात ही फळपीक विमा रक्कम मतदार संघातील शेतकर्‍यांना आधार देणारी आहे, असे आ. कोल्हे म्हणांल्या