Breaking News

टिकटॉकवरील व्हिडिओचे अनुकरण करताना गळफास ; 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर
हंसपुरी भागातील 12 वर्षांय मुलीने टिकटॉकवरील गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतला. यात तिचा मृत्यू झाला. शिखा विनोद राठोड असे, या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता सहावीत शिकत होती.शनिवारी (30 जून) शाळेतून आल्यावर सायंकाळी शिखा आपल्या खोलीत लहान बहिणीसोबत टिकटॉकवर दोन मुली गळफास लावत असल्याचा व्हिडीओ पाहत होती. शिखाने व्हिडीओ पाहून आपला पट्टा देखील पंख्याला बांधला. ती व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे करू लागली. ती ज्या स्टुलवर उभी होती, तो खाली पडला आणि तिच्या पट्ट्याचा गळ्याला फास बसला.त्यानंतर लहान बहिणीने स्वयंपाकघरात असलेल्या आईला बोलावून आणले. आईने बेशुद्धावस्थेतील शिखाला खाली उतरवले. तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.टिकटॉकवरील व्हिडिओचे अनुकरण करताना गळफास बसल्याने 12 वर्षीय मुलीचा मृत्यूयापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. तिने आपल्या आईलाही या व्हिडीओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडीओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती. मात्र, ती असा काही प्रकार प्रत्यक्षात करेल, असे तिच्या कुटुंबाला वाटले नव्हते.