Breaking News

परवानगी नसतानाही 15 व्या मजल्यावरील फ्लॅटची बुकींग

दादरमधील सोने व्यापार्‍याची 4 कोटी 62 लाखांना फसवणूक, विकासकाविरुद्ध गुन्हा

मुंबई
पुर्नविकासाअंतर्गत 13 मजल्यापर्यंतच परवानगी असताना, 21 मजली इमारत बांधत असल्याचे सांगून दादरमधील व्यावसायिकाला 4 कोटी 62 लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी शिवाजीपार्क पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दादर पश्‍चिमेकडील रानडे रोड परिसरात राहात असलेल्या 45 वर्षीय तक्रारदार व्यावसायिक यांचा सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. स्वत:च्या मालकीचा फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांनी मित्र रमेश जैन यांच्याशी याबाबत चर्चा केली. दागिन्यांचे दुकान असलेल्या इमारतीचा पुर्नविकास होत असल्याने याच इमारतीत फ्लॅट घेतल्यास फायद्याचे ठरेल असे त्यांनी सांगितले.
व्यावसायिकाने याबाबत दलाल कुमार पाल यांना विचारणा केली असता इमारतीचा पुर्नविकास साई सदगुरू डेव्हलपर्स कंपनी करत असून जितेंद्र जैन आणि अन्य एक जण कंपनीचे भागिदार आहेत. दोघेही आपल्या चांगल्या परिचयाचे असून या प्रकल्पामध्ये योग्य दरात फ्लॅट मिळवून देतो असे त्यांनी सांगितले. पाल यांच्या या आश्?वासनावर विश्?वास ठेवत मार्च 2010 मध्ये व्यावसायिक यांनी फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पाल यांनीच त्यांची भेट बिल्डर जैन आणि दळवी यांच्याशी घडवली. बिल्डर जैन यांनी पुर्नविकासातील इमारत 21 मजल्यांची असल्याचे सांगितले. त्यानुसार दोन फ्लॅट बूक करत व्यावसायिक यांनी ठरल्याप्रमाणे पैसे भरले. ऑगस्ट 2014 पर्यंत 13 मजल्यांचे बांधकाम झाले होते. डिसेंबर महिन्यात मात्र दोन्ही भागिदारांत वाद झाल्याचे व्यावसायिक यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांना सांगत सहा महिन्यांत प्रकल्प पूर्ण करणार असल्याची बतावणी करण्यात आली. इमारतीच्या 13 मजल्यांचे काम पूर्ण होऊन रहिवाशी राहायला आल्याने व्यवसायिकांनी याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून माहिती घेतली असता 13 मजल्यांपर्यंतच इमारतीच्या बांधकामास मंजुरी असल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली. तोपर्यंय या सोने व्यावसायिकाचे फ्लॅट आणि दुकान गाळा देण्याच्या नावाखाली बिल्डरांनी सुमारे 5 कोटी रुपये लाटले होते. तर अशाप्रकारे त्यांनी पनवेलमधील एका व्यापाजयाची या इमारतीत फ्लॅट देण्याचे आमीष दाखवत 1 कोटी 32 हजार रुपयांना फसवणूक केल्याचेही समोर आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने अखेर सोने व्यापाजयाने बिल्डरांकडे भरलेले पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र पैसे न मिळाल्याने अखेर त्यांनी शिवाजीपार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी भादंवी आणि महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियम, महाराष्ट्र मालकी फ्ॅलट अधिनियमातर्गंत गुन्हा दाखल केला आहे.