Breaking News

नेवासे येथे महालोक अदालतमध्ये 266 प्रकरणे निकाली

नेवासे/प्रतिनिधी
 नेवासे न्यायालयात आयोजित महा लोकन्यायालायाला शनिवारी (दि.13) जुलै रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महालोक अदालतमध्ये 266 प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यात मोठे यश मिळाले. या महालोकअदालत मध्ये दाखल व दाखलपूर्व अशी मिळून 7225 प्रकरणे दाखल होती. यापैकी 266 प्रकरणे मिटली. यात वसुलीसाठीच्या प्रकरणात ही मोठा वसूल मिळाला. सकाळी साडेदहा वाजेपासूनच पक्षकारांनी न्यायालयात गर्दी करायला सुरुवात केली होती. अकरा वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम.बेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात पॅनल बनवण्यात आले होते.
  पॅनल न.1 वर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम.बेलकर हे पॅनल प्रमुख म्हणून होते. तर या पॅनलवर पंच म्हणून अ‍ॅड.कविता नवले व राजेंद्र पठाडे यांनी काम पाहिले. पॅनल नंबर दोनवर दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम.तापकीरे पॅनल प्रमुख होते. त्यांचे समोर वीज मंडळाची व  दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आले होते. पक्षकरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी दिसून आली. वीज मंडळाच्या 48 प्रकरणात या वेळी तडजोड झाल्या. पंच म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुधीर चव्हाण व अ‍ॅड.सोनल पाटील-वाखुरे यांनी काम पाहिले. पॅनल नंबर तीनवर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश बी.यु.चौधरी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. पंच म्हणून अ‍ॅड.एस.एस.लवांडे, जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब पाठक यांनी काम पाहिले. पॅनल नंबर चारवर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस.डी.सोनी यांनी काम पाहिले. तर पंच म्हणून यासिन शेख व अ‍ॅड.मधुबाला बिंगी यांनी काम पाहिले. पॅनल नंबर पाचवर कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए.बी.निवारे यांनी काम पाहिले. तर पंच म्हणून अ‍ॅड.ए.बी.पुंड व डॉ.धनश्री साळुंके यांनी काम पाहिले. पॅनल नंबर सहावर कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.राऊत यांनी काम पाहिले. तर पंच म्हणून राम शिंदे व ए.टी.झिने यांनी काम पाहिले. पॅनल नंबर सात वर न्यायाधीश ए.ए.पाचरणे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तर पंच म्हणून ए.एच.काळे व कमलेश गायकवाड यांनी काम पाहिले.
  न्यायालय परिसर यावेळी गर्दीने फुलून गेला होता. किरकोळ कारणावरून असलेले मतभेद बाजूला तडजोडीने प्रकरणे मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हा न्यायाधीश एस.एम.बेलकर यांनी लोकन्यायालय प्रसंगी बोलताना केले.