Breaking News

बस दरीत कोसळून 33 ठार; 22 जखमी

श्रीनगर
जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार झाले आहेत, तर 22 जण जखमी झाले आहेत. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि 33 जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
किश्तवाड येथील पोलिस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार, या अपघातात 33 प्रवाशांचा मृत्यू झाला. जे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन पोहचले असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ही घटना कळल्यानंतर आपल्याला अतीव दुःख झाल्याचे म्हटले आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच जे जखमी झाले आहेत, त्यांना लवकारत लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना मी करतो असेही शाह यांनी म्हटले आहे.