Breaking News

फेसबुकला 34 हजार कोटींचा दंड

डेटा लीक प्रकरण; आतापर्यंतची सर्वांत मोठी शिक्षा

वॉशिंग्टन
अमेरिकेच्या फेडरलल ट्रेड कमिशनने डेटा लीक प्रकरणी फेसबुकवर पाच बिलीयन डॉलर म्हणजे 34 हजार280 कोटी रुपयांचा दंड लावण्याची मागणी करण्यात आली आहे. एखाद्या टेक कंपनीवर लागलेली ही सर्वांत मोठी पेनल्टी आहे. याआधी गुगलवर 2012 मध्ये 154 कोटींचा दंड लागला होता. फेसबुकवरील दंडाचा निर्णय न्यायालय करणार आहेत. 2018 मध्ये सर्वात मोठे फेसबुकचे डेटा लीक प्रकरण समोर आले होते. जगभरात गाजलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणी फेसबुकला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यामांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म केम्ब्रिज एनालिटिकाला डेटा लीक केल्याप्रकरणी फेसबुकचे ‘सीईओ’ मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर एफटीसीने तपास सुरू केला. केंब्रिज अ‍ॅनालिटीक या राजकीय विश्‍लेषक कंपनीने फेसबुकचा 8.7 कोटी युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आणि इतर खासगी माहिती जमा केली होती. ही माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान गोळा करण्यात आली होती. विशेष म्हणजेच युजर्सच्या खासगी माहितीचे रक्षण व्हावे, या दृष्टीने फेसबुकने स्वत: ही सर्व माहिती 2012 ला केंब्रिज अ‍ॅनालिटीकला दिली होती. त्यानंतर फेडरलल ट्रेड कमिशनने 2018 पासून याप्रकरणी चौकशी सुरू केली होती.

दरम्यान या प्रकरणी फेसबुकला फारसा काही झटका लागलेला नाही. कारण याप्रकरणी दंड आकारला जाणार, याची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना पूर्वकल्पना होती. त्यानुसार त्यांनी तीन अब्ज डॉलर एवढी रक्कम बाजूला काढून ठेवली आहेत. तसेच 2019 च्या पहिल्या तीन महिन्यात 15 बिलीयन डॉलर महसुलाची कमाई केली होती. विशेष म्हणजे फेसबुकला बसलेल्या दंडानंतर त्याच्या शेअर बाजारात फेसबुकच्या शेअरने एक टक्क्याने उसळी घेतली आहे.

लाखो नागरिकांचा डाटा वापरला
फेसबुकवरील लाखो नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने वापरल्याची धक्कादायक माहितीही यानिमित्ताने समोर आली होती. यानंतर फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्याने फेसबुक आणि केंब्रिज अ‍ॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्‍लेषक कंपनी वादात सापडली होती.