Breaking News

केज तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडितेच्या चुलत बहिणीसह तरुणावर गुन्हा

केज | प्रतिनिधीः-
शेतात शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने तिच्याच चुलत बहिणीच्या मदतीने बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. पीडितेच्या चुलत बहिणीसह तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  पीडित मुलगी ही इयत्ता ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे कुटुंब हे शेत वस्तीवर वास्तव्यास आहे. तिची चुलत बहीण ही पतीने सोडून दिल्याने माहेरात राहत असून शेळ्या सांभाळून तिचा उदरनिर्वाह चालविते. तर पीडितेची चुलत बहीण वआरोपी बाळू घुले ( रा. टाकळी ) हे दोघे शेतातशेळ्या सोबत त्यांची ओळख असल्याचे हे पीडित मुलीला शाळेच्या सुट्याच्या काळात चुलत बहिणीसोबत गेल्यामुळे माहीत होते. पीडित मुलगी ही गुरुवारी ( दि. २७ ) रात्री आठ वाजता शेतातशौचास गेली असता अंधारात तिची चुलत बहीण व आरोपी बाळू घुले हे थांबले होते. चुलत बहीणीने पीडितेला आरोपीसोबत झोप म्हणून हाताला धरून आरोपीच्या ताब्यात दिले. बाळू घुले याने पीडित मुलीवरबळजबरीने बलात्कार केला. पीडितेने विरोध करीत ओरडली. तेवढ्यात मुलगी बराच वेळ झाला, तरी शौचाहून परत न आल्याने तिची आई शोधत आली. तिच्या आईला पाहून आरोपी बाळू घुले याने तेथून धूम ठोकली. पीडितेला घरी आल्यावर तिच्या आईवडिलांनी विचारले असता तिने तिच्यासोबत झालेल्या प्रकार सांगितला. शनिवारी रात्री उशिरा पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिची चुलत बहीण व आरोपी बाळू घुले या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार डी. व्ही. सिध्दे हे पुढील तपास करत आहेत.