Breaking News

औरंगाबादमध्ये एसबीआयचे एटीएमच पळवले

औरंगाबाद
शहरातील बीड बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोर असलेले एसबीआयचे एटीएम मशीनच शुक्रवारी मध्यरात्री चोरटयांनी पळवून नेले. या एटीएममधील सुमारे 25 लाख रूपये चोरटयांनी लंपास केले.
याविषयी अधिक महिती अशी की सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय झाले आहेत. बायपासवरील दत्त मंदिरासमोर भारतीय स्टेट बँकेचे अनेक वर्षापासून एटीएम सेंटर आहे. सेंटरवर दोन एटीएम आहेत,परंतु येथे सुरक्षारक्षक नसतो. शुक्रवारी रात्री चोरट्यायां रोकड लुटण्यासाठी चक्क एक मशीनच चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. एटीएममध्ये जवळपास 25 लाखाची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार काल दुपारीच मशीनमध्ये रक्कम जमा करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक मधूकर सावंत आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देउन चोरट्यान्चा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला हे एटीएम नेण्यासाठी मोठ्या चारचाकी वाहणाचा वापर करण्यात आला असावा आणि चोरट्यांची संख्या अधिक असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. औरंगाबाद शहरातील एटीएम चोरीला जाण्याची घटना प्रथमच घडली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुरक्षेचा हलगर्जीपणा
एटीएम मशीन पळवून नेण्यात चोरटे यशस्वी झाले असले तरी, यामुळे सुरक्षेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. बँकेने एटीएम सुरक्षा करण्यासाठी कोणताही सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता. तसेच एटीएम मशीन उचलून घेऊन जाऊ नये यासाठी या मशीन जमिनीला किंवा भिंतीला नट बोल्टच्या सहाय्याने फिक्स करण्यात येतात. मात्र ही मशीन एकच वायरवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.