Breaking News

केज-कळंब रोडवर साळेगाव येथील शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ रिक्षाची एसटीला मागून धडक

शारदा इंग्लिश स्कुलच्या चार शिक्षिका जखमी : दोघी गंभीरप्रतिनिधी
केज | दि.३० जून
 केज कळंब रोडवर साळेगाव जवळ एका आपे रिक्षाने एसटीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात शारदा इंग्लिश स्कुलच्या चार शिक्षिका जखमी झाल्या असून त्या पैकी दोघी गंभीर जखमी असून त्यांना स्वाराति अंबाजोगाई येथे हलविले आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ३० जून रविवारी रोजी दुपारी १२:३०च्या दरम्यान केज येथील शारदा इंग्लिश स्कुल या नामांकित शाळेत अद्यापन करणार्‍या सुवर्णा मुचुंडेकर, शीतल मुचुंडेकर, सुनीता सकपाळ आणि चिलीया मेडसकर या चौघी अँपे रिक्षा (एम एच-२३/एक्स-१९४१) या कळंबकडे जात असताना साळेगाव येथील शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ रिक्षाच्या पुढे धावणार्‍या कळंब आगराच्या एसटीला (क्र.एमएच-२०/बीएल-०१९४) या मागील बाजूने जोराची धडक देऊन अँपे रिक्षा पलटी झाली. त्यातील या सुवर्णा मुचुंडेकर, शितल मुचुंडेकर, सुनिता सकपाळ आणि चिलीया मेडसकर या चौघी जखमी झाल्या. यातील दोघींना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाला आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे हलविले आहे. दरम्यान जखमींची परिस्थिती चांगली असल्याची माहिती कळते. ङ्गङ्गया अपघाताची नोंद केज पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

जखमीच्या मदतीला रमेश आडसकर धावले !
या अपघातातील जखमी शिक्षिका याना अंबाजोगाई येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी अंबाजोगाई येथे जाऊन जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांशी उपचार बाबत चर्चा केली. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून जखमींना केलेल्या मदती बद्दल रमेश आडसकर यांचे कौतुक होत आहे

साळेगावची रुग्णवाहिका तात्काळ मदतीला आली
साळेगाव येथील बांधकाम क्षेत्रातील उडद्योजक रमेश गालफाडे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त गावासाठी दिलेली विनामूल्य रुग्णवाहिका आजच्या अपघात प्रसंगी कामी आली आणि त्याचा चालक पोपट बचुटे यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले