Breaking News

गडकिल्ल्यांचे संवर्धन केल्यास जगभरातून पर्यटक येतील- शेंदरे

संगमनेर/प्रतिनिधी 
शासनाने केवळ शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन केल्यास जगभरातून इजिप्तला पिरॅमिड बघायला जाणारा ओघ भारताकडे वळेल. यातून महाराष्ट्राला या पर्यटनातून दरवर्षी ३ लाख कोटी रुपये मिळू शकतील. शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत विद्यापीठ निर्माण झाले पाहिजे असे प्रतिपादन सेवाह एज्युकेशन हब प्रा. लि., नाशिक चे संचालक श्रीकांत शेंदरे यांनी केले.

  येथील राज पॅलेस कॉन्फरन्स हॉल येथे एथिक्स एज्यु. एक्सलन्स व फंडस्पीनर एज्युकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'छत्रपती शिवाजी - द बिझिनेस गुरू' या व्याख्यानप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रमोद राजुस्कर तर व्यासपीठावर डॉ. सोनाली कुटे, सुनील कडलग, दर्शन वाकचौरे उपस्थित होते.

   आपल्या प्रास्तविक भाषणात सुनील कडलग यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटरीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद राजुस्कर म्हणाले की आपली ओंजळ भरल्यानंतर वाया जाणारा पैसा सामाजिक भान राखून समाजउत्थानासाठी दिला पाहिजे. याप्रसंगी सेवाहचे को-लिडर सुधीर फरगडे, संतोष फटांगरे, आशिष शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव आहेर यांनी तर आभार प्रदर्शन सागर शिंदे यांनी केले.