Breaking News

वनडेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणार्‍यांत कोहली तिसरा

मुंबई
आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेत टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम ठेवताना विंडीजचा 125 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने गुणतालिकेत 11 गुणासह दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात विराट कोहलीने 72 धावांची शानदार खेळी साकारत सामनावीर पुरस्कार पटकावला. विराटचा हा 33 वा सामनावीर पुरस्कार ठरला. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणाऱया यादीत तो तिसऱया स्थानी आला आहे.  त्याने हा विक्रम नोंदवताना जॅक कॅलिस, रिकी पॉटिंग व शाहिद आफ्रिदी यांना मागे टाकले आहे. या तीनही खेळाडूंनी वनडेमध्ये 32 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. या यादीत भारताचा दिग्गज खेळाडू व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 62 सामनावीर पुरस्कारांसह अग्रस्थानावर असून लंकेचा सनथ जयसुर्या 48 सामनावीर पुरस्कारासह दुसऱया स्थानी आहे.सामनावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू -
सचिन तेंडुलकर - 62 सामनावीर पुरस्कार
सनथ जयसुर्या - 48
विराट कोहली - 33
कॅलिस, पॉटिंग - 32
रिचर्ड्सन - 31
सौरव गांगुली - 31