Breaking News

फुलचंद कराड यांच्या चारा छावणीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी मानले आभार

परळी| प्रतिनिधीः-
तालुक्यात लिंबुटा (गोपीनाथगड) येथे यावर्षी प्रथमच सुरु झालेल्या चारा छावणीमुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या पशुधनाची व्यवस्था झाली असून यामुळे शेतकर्यांनी चारा छावणीचालकांचे आभार मानले आहे. तर शेतकर्‍यांच्या सहकार्यामुळेच ही चारा छावणी यशस्वीपणे चालवू शकलो असे प्रतिपादन चारा छावणीचालक तथा परळी तालुका दुध संघाचे चेअरमन, भाजपा जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी केले आहे.  तालुक्यातील लिंबुटा येथे मागील दिड महिन्यापासून शेतकर्यांच्या जनावरांसाठी चारा छावणी सुरु करण्यात आली होती. या चारा छावणीत जनावरांसाठी आरोग्य, पाणी, चारा अशा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तसेच या चारा छावणीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून चारा छावणीची पाहणी करत समाधान व्यक्त केले होते. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी फुलचंद कराड यांचे कौतुकही केले होते. मुख्यमंत्र्यांनी ३ जून रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, भगवानसेनेचे सरसेनापती व भाजपा जेष्ठ नेते फुलचंद कराड, जिल्हाधिकारी अस्तीककुमार पांडे  आणि अधिकार्यांच्या उपस्थितीत भेट दिल्यानंतर  ही छावणी आदर्श असल्याचे सांगितले होते. या चारा छावणीत व्यवस्थीत शेड, स्ट्रीट लाईट, पाणी, चारा अशा मुबलक सुविधा असल्यामुळे शेतकर्यांनी पाऊस पडे पर्यंत आपली जनावरे चारा छावणीत ठेवली होती. सध्या आषाढी वारी व पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी आपले जनावरे घेवून जात आहेत.