Breaking News

वृक्ष लागवडीचा वेग वाढवणे गरजेचे : कदम

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
लोकसंख्या वाढीचा व वृक्ष तोडीचा असाच वेग राहिला तर चीन सारखी अवस्था आपल्या देशाची होईल.  आँक्सीजन विकत घेण्याची वेळ आपल्यावर येवू न देण्यासाठी वृक्ष लागवडीचा वेग वाढवला पाहिजे असे प्रतिपादन शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष व माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी केले.

 राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या  वतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भिमराज कदम हे होते. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, गोरख मुसमाडे, भगवान कदम, संभाजी कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनेते सचिन ढूस यांनी तर सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले. आभार नगरसेविका सुजाता कदम यांनी मानले.