Breaking News

खामखेड्यात कत्तलीसाठी घेऊन जाणारे बेवारस वाहन पोलिसांच्या ताब्यात

देवळा /प्रतिनिधी
तालुक्यातील खामखेडा येथील राष्ट्रीय ग्रामीण महामार्गावरील मोरेवाडी जवळील दत्तनगर येथे अवैधरित्या 8 गायी व 2 वासरे कोंबून भरलेली पिकअप क्रमांक एम एच -17 -टी - 5387 हे कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता पकडण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, खामखेडा ते सटाणा या रस्त्यावर दत्तनगर जवळ रात्री 8 गायी व 2 वासरे कत्तलीसाठी कोंबून घेऊन जाणारी पिकअप रस्त्याच्या कडेला बेवारस लावून यातील चोरांनी पळ काढला. ही घटना या रस्त्यावरून जाणार्‍या खामखेडा येथील काही वाहन धारकांच्या लक्षात आल्याने त्यानी तात्काळ गावातील व शेजारील ग्रामस्थांना कळवले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी देवळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करून पिकअप वाहन पोलिस स्टेशनला जमा केले.
वाहनातील बंदिस्त असलेली 8 गायी व 2 वासरे ही ग्रामस्थांनी पिकअप मधून बाहेर काढली व शेजारील रहाणार्‍या छगन मोरे यांच्या शेतात बांधली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे, व पोलिस नाईक पवार हे करत आहेत.संतप्त ग्रामस्थांनी मालकास व ड्रायव्हर यांची कसून चौकशी ,त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात देवळा पोलिसांत अज्ञान इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.